17 डिसेंबर : मुंबईतील झवेरी बाजार परिसरातील चार व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर ईडीने छापे टाकले आहे. या छाप्यात तब्बल 69 कोटी रूपये जप्त करण्यात आले आहे. यात 69 कोटींमध्ये सर्व नोटा जुन्या आहे. या व्यापाऱ्यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवून काळा पैशाचं पांढरा केल्याचा संशय आहे. या चारही व्यापाऱ्यांची बँक खाती सील करण्यात आलीये.
काळा पैसा पांढरा करण्यासाठी सोन्याची खरेदी करण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे ईडीने अशा व्यवहारांवर करडी नजर ठेवली होती. झवेरी बाजार परिसरात काही व्यापाऱ्यांनी सोने विक्री दाखवून पैसे बँकेत जमा केले जात होते. याच संशयातून ईडीने शुक्रवारी चार व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर छापे टाकले. या छाप्यात सराफा व्यापाऱ्यांच्या खात्यात तब्बल 69 कोटी रुपये हे कोणतेही व्यवहार न करता जमा झाल्याचं समोर आलंय. या व्यापाऱ्यांची झाडाझडती सुरू आहे. या प्रकरणाच्या निमित्ताने झवेरी बाजारात काळा पैशाचं पांढरं करणाऱ्या रॅकेड उजेडात आलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv