बारामती पवारांचीच !, भाजपला धोबीपछाड

बारामती पवारांचीच !, भाजपला धोबीपछाड

  • Share this:

pawar_baramati_bjp15 डिसेंबर : पवार म्हणजे बारामती आणि बारामती म्हणजे पवार हे समिकरण पुन्हा एकदा सिद्ध झालंय. बारामतीत पवारांना पाणी पाजण्याची गर्जना करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवत पवारांचा आपला 'जाणता राजा' असल्याचं दाखवून दिलंय. 39 जागांपैकी राष्ट्रवादीने तब्बल 35 जागा जिंकल्या आहे.

नगरपरिषदा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात पुणे आणि बारामतीत काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पहिल्या टप्प्यात भाजपने घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपने दुसऱ्या टप्प्यात ताकदीनिशी उतरली. स्वत:मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी प्रचार सभा घेऊन वातावरण तापवले. तर दुसरीकडे गिरीश बापटही तळ ठोकून होते.

मात्र, आज निकालअंती मुख्यमंत्र्यांच्या पदरीनिराशाच पडली. बारामतीत पवारच पॉवरफुल्ल ठरलेत. बारामतीत राष्ट्रवादीला संपूर्ण बहुमत तर मिळालंच शिवाय नगराध्यक्षपदाचा उमेदवारही विजयी झालाय. बारामतीत राष्ट्रवादीला 39 पैकी 35 जागा मिळाल्यात.

तर नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा तावरे विजयी झाल्यात. भाजप पुरस्कृत आघाडीला अवघ्या चार जागा मिळाल्यात. बारामतीत यावेळी भाजपनं एकाप्रकारे पवार कुटुंबीयांना मोठं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान राष्ट्रवादीनं सहज परतावून लावलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 15, 2016, 8:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading