नगरपरिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात सरासरी 72 टक्के मतदान, दिग्गजांचा भवितव्य मतपेटीत बंद

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2016 10:13 PM IST

voting pole banner14 डिसेंबर : नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातलं पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या 14 नगरपालिकांसाठी आज मतदान झालंय. पुणे जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि नगरपरिषदांसाठी हे मतदान पार पडलं. बारामती, सासवड इंदापूर, दौंड, जेजुरी तसंच आळंदी, जुन्नर, लोणावळा, तळेगाव आणि शिरूर या नगर परिषदांचा यात समावेश आहे. सरासरी 72 टक्के मतदान झालं.

पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालंय. भाजपचे 52 नगराध्यक्ष निवडून आलेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे-बारामतीत भाजप राष्ट्रवादीला धक्का देणार का याबाबत उत्सुकता आहे. अजित पवार, हर्षवर्धन पाटील,शिवाजी अढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे आणि गिरीश बापट या सगळ्याच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर लातूर जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदांसाठीही मतदान होतंय. यात अहमदपूर, उदगीर, औसा आणि निलंगा अशा चार पालिकांचा समावेश आहे. लातूर जिल्ह्यावर तसं काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय. पण निलंगा जो मंत्री संभाजी पाटील यांचा मतदारसंघ आहे तिथं काय होणार याची उत्सुकता आहे. लातूर जिल्ह्यात मतदान होत असलेल्या पालिकेत सर्वात मोठी पालिका उदगीरची आहे. उद्या पुणे-लातूर जिल्ह्यातली मतमोजणी असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 14, 2016 08:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...