छगन भुजबळांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं पुन्हा फेटाळला

छगन भुजबळांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं पुन्हा फेटाळला

  • Share this:

Chagan Bhujbal new1

14 डिसेंबर - बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी गेल्या 9 महिन्यांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांची सुटकेची आशा पुन्हा एकदा मावळली आहे. मुंबई हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे सुटकेसाठी भुजबळांना आता सुप्रीम कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनासह विविध घोटाळ्यांप्रकरणी भुजबळ यांना 14 मार्चला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तुरुंगात असलेल्या भुजबळ यांनी सुटकेसाठी अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्यांना दिलासा मिळू शकला नाही. अखेर त्यांनी आपली अटकच बेकायदेशीर असल्याचं सांगत सक्तवसुली संचालनालयाच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळं आपल्याला लवकरात लवकर जामीन मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

त्यावेळी ईडीनं केलेली अटक बेकायदा नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळं भुजबळ यांच्यापुढं आता सुटकेसाठी सुप्रीम कोर्ट हाच पर्याय उरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 14, 2016, 2:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading