नागपूरमध्ये मराठा कुणबी मोर्चाची सांगता

नागपूरमध्ये मराठा कुणबी मोर्चाची सांगता

  • Share this:

nagpur_maratha_morcha3

 14 डिसेंबर : राज्यभरात मराठा क्रांती मोर्च्याचं घोंघावणारं वादळ अखेर आज नागपुरात हिवाळी अधिवेशनावरही धडकलं. या मोर्च्यात विदर्भातील मराठा समाज एकवटले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन या मोर्च्याची सांगता झालीये.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणा-या मोर्चाची तयारी दोन महिन्यांपासून करण्यात आली. नागपुरातील यशवंत स्टेडिअमवरुन मोर्चाला सुरुवात झाली आणि मोरिस कॉलेज टी पाईंटजवळ मोर्च्याची सांगता झाली. आरक्षणाच्या मागणीवरून विधिमंडळात चर्चा झाली. कोर्टात प्रकरण असल्याने सरकारने आरक्षण देणारच अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात विधानसभेतील चर्चेला उत्तर देताना जाहीर केली आहे. त्यापार्श्वभूमीवर आज मराठा समाजाचा मोर्चा ठरल्याप्रमाणे लाखांच्या संख्येनं निघाला. नेहमीप्रमाणे मराठा समाजाचं नेतृत्व करणा•या मुलींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलंय. आरक्षणाच्या मुद्यावर सरकारकडून योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. या मोर्चामध्ये संपूर्ण विदर्भातून मराठा समाजाचे लोक एकत्र आले होते.

दरम्यान, याच मुद्यावरुन बीडमध्ये 2 एसटी फोडण्यात आल्या आहेत. मराठी आरक्षणाच्या मागणीसाठी ही तोडफोड करण्यात आली आहे. बीडमधल्या पाडाळशिंगी गावातली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी बस फोडणा•या आंदोलकांना ताब्यातही घेतल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 14, 2016, 4:58 PM IST

ताज्या बातम्या