News18 Lokmat

दुसऱ्या टप्प्यातील 14 नगरपालिकांसाठी मतदान सुरू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 14, 2016 10:00 AM IST

voting_story_647_090915063131

14 डिसेंबर :  नगरपालिकांच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचं आज मतदान होत आहे. यामध्ये पुण्यातील 10 आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे पुण्याच्या बालेकिल्ल्यात अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादीला चांगलाच जोर लावाला लागेल.

बारामती म्हणजे पवार घराण्याचा बालेकिल्ला. बारामतीच्या 39 सदस्यीय नगरपालिकेत बहुमत मिळवण्याबरोबरच नगराध्यक्ष निवडून आणण्याचं आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे.

पहिल्या टप्प्यातील 164 नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं असून राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. भाजपचे 52 नगराध्यक्ष निवडून आलेत. नगराध्यक्षपदांमध्ये राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे-बारामतीत भाजप राष्ट्रवादीला धक्का देणार का याबाबत उत्सुकता आहे.अजित पवार, हर्षवर्धन पाटील,शिवाजी अढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे आणि गिरीश बापट या सगळ्याच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुसरीकडे औरंगाबादमध्येही महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी अर्ज भरले असल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Loading...

पुणे:  1) बारामती, 2) लोणावळा, 3) दौड, 4) तळेगाव-दाभाडे, 5) आळंदी, 6) इंदापूर, 7) जेजुरी, 8) जुन्नर, 9) सासवड 10) शिरूर

लातूर:  1) उदगीर, 2) औसा, 3) निलंगा व 4) अहमदपूर

पुणे जिल्हा निवडणूक

- नगर पालिका/परिषदा

- एकूण 10 ठिकाणी मतदान

- नगरसेवक, एकूण जागा 223

- रिंगणातील एकूण उमेदवार 826

- बिनविरोध निवडणूक 7 जागी बिनविरोध

लातूर जिल्हा निवडणूक

औसा - नगराध्यक्ष -13 - नगरसेवक - 101 - एकूण - 21

अहमदपुर - नगराध्यक्ष - 06 - नगरसेवक - 115 - एकूण - 24

उदगीर - नगराध्यक्ष - 12 - नगरसेवक - 185 - एकूण - 38

निलंगा - नगराध्यक्ष - 07 - नगरसेवक - 100 - एकूण - 21

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2016 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...