13 डिसेंबर : एकीकडे नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना पैसे मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे नव्या नोटासह कोट्यवधीचे घबाड आयकर विभाग आणि पोलिसांच्या हाती लागत आहे. ठाण्यात तब्बल 1 कोटी 40 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीये. यामध्ये सर्व 2000 च्या नव्या नोटा आहे.
ठाणे पोलिसांना माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेने मोठ्या शितफीने कारवाई केली. जप्त केलेल्या सर्व नवीन चलनातील नोटा असून या प्रकरणात 3 आरोपींना ताब्यात घेतले आहेत. हे तीनही आरोपी व्यावसायिक असून ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाच्या आवारातून या तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघे नोटा बदली करण्यासाठी येणार असल्याची ठाणे पोलिसांना माहिती मिळाली होती . ह्या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दिशेने ठाणे पोलीस तपास करीत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv