12 डिसेंबर : मुंबई कसोटीत टीम इंडियानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं इंग्लंडला 1 डाव आणि 36 धावांनी पराभूत केलंय. कर्णधार विराट कोहलीचा द्विशतकाचा पराक्रम, सलामीवीर मुरली विजयचा शतकी धमाका, जिगरबाज जयंत यादवचं विक्रमी शतक आणि किमयागार फिरकीपटू रविचंद्रन अश्विननं दोन्ही डावांत मिळून घेतलेल्या एक डझन विकेट, या जोरावर टीम इंडियानं इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट विजय मिळवला आहे.
वानखेडेच्या मैदानावर मुंबईकरांच्या साक्षीने भारतीय संघाने विजयाला गवसणी घातली आहे. इंग्लंडला विजयासाठी 231 धावांची आवश्यकता होती. पण इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 195 धावांतच गारद झाले, तर अश्विन दुसऱ्या डावात इंग्लंडचे 6 गडी बाद केले. दरम्यान, एका वर्षात तीन कसोटी द्विशतकं झळकावणारा विराट कोहली 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे. तर एका डावात पाच विकेट घेण्याची किमया 24व्यांदा करून अश्विननं कपिल देवला मागे टाकलं आहे.फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारताने या सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv