'आम्हाला माफ करा, आम्ही त्याला सोडून देत आहोत'

'आम्हाला माफ करा, आम्ही त्याला सोडून देत आहोत'

  • Share this:

alibag09 डिसेंबर : अलिबागमध्ये निर्दयी पालकांनी आपल्या 11 वर्षांच्या गतिमंद मुलाला वा-यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या पालकांनी आपल्या मुलाला एका रिक्षाचालकाकडे सोडून दिलं आणि त्याला घ्यायला ते परत आलेच नाहीत.

अलिबागमधले रिक्षाचालक अनंत शेलार हे जोगळेकर नाक्यावर रिक्षा घेऊन उभे होते. त्यावेळी एक चाळीशीचे गृहस्थ त्यांच्या मुलासोबत रिक्षात बसले आणि त्यांनी रिक्षा अलिबागच्या समुद्रकिनारी न्यायला सांगितलं. तिथे पोहोचल्यानंतर हे गृहस्थ रिक्षातून खाली उतरले. रिक्षाचालक अनंत शेलार यांना त्यांनी पैसे दिले आणि माझ्या दोन मित्रांना मी घेऊन येतो, असं त्यांनी सांगितलं.

तब्बल दीड तास उलटला तरीही या मुलाचे वडील परतले नाहीत. त्यामुळे अनंत शेलार यांनी या मुलाला घेऊन अलिबाग पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी केली. हा मुलगा काहीही बोलू शकत नव्हता पण त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीसोबत यात 100 रुपयेही होते.

"घरच्या परिस्थितीला आणि मुलाच्या आजारपणाला कंटाळून आम्ही त्याला सोडून देत आहोत, आम्हाला माफ करा", असं या चिठ्ठीत लिहिलं होतं. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि या मुलाची रवानगी बालसुधारगृहात केलीय. या मुलाला सोडून जाणा-या बापाचा ते शोध घेतायत. पण या निष्पाप, निराधार मुलाच्या आयुष्याचं पुढे काय ? असा प्रश्न उभा ठाकलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 9, 2016, 7:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading