'बेवॉच'चा ट्रेलर रिलीज पण प्रियांका काही सेकंदांसाठीच

'बेवॉच'चा ट्रेलर रिलीज पण प्रियांका काही सेकंदांसाठीच

  • Share this:

baywatch-story_647_120816075208

09 डिसेंबर :   बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित 'बेवॉच' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची गेल्या बर्‍याच महिन्यांपासून चर्चा सुरू होती. प्रियांकाला पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक होते. मात्र नुकत्याचा रिलीज झालेल्या या पहिल्या ट्रेलरमध्ये प्रियांका अवघ्या काही सेकंदांसाठी दिसली आहे. त्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.

पुढच्या वर्षी 26 मेला रिलीज होणारा 'बेवॉच' हा चित्रपट, याच नावाच्या गाजलेल्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे. त्यामध्ये ड्वेन जॉन्सन 'द रॉक' प्रमुख भूमिकेत असून झॅक एफ्रॉन, अलेक्झांड्रा डॅडारिओ, जॉन बॉस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या हॉलिवूडपटाचं मुख्य पोस्टर जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं होतं.

चित्रपटात प्रियांका खलनायिकेची भूमिका साकारत असून तिचे हॅलोविन स्वरूपातील स्पेशल पोस्टर ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सध्या समोर आलेल्या ट्रेलरमध्ये तिची केवळ एक झलकच दिसल्याने तिचे चाहते निराश झाले असतील हे नक्कीच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 9, 2016, 2:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading