S M L

'रईस' रिलीज होईपर्यंत चलनतुटवड्याचे प्रश्न संपतील - शाहरूख खान

Sonali Deshpande | Updated On: Dec 9, 2016 03:48 PM IST

 'रईस' रिलीज होईपर्यंत चलनतुटवड्याचे प्रश्न संपतील - शाहरूख खान

 

srk-raees-759

09 डिसेंबर : 'चलनतुटवड्यामुळे 'रईस'च्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही,' हा विश्वास व्यक्त केलाय किंग खाननं. बुधवारी 'रईस'च्या ट्रेलर लॉचच्या सोहळ्यात शाहरुख आपला आगामी चित्रपट,डिअर जिंदगी आणि चलनतुटवड्याविषयी बोलत होता.



पुढच्या काही दिवसांत अर्थात रईसच्या रिलीजपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत स्थिरता येईल,असं शाहरूख खानचं म्हणणं आहे. 'नोटबंदी आणि नोटबदलींमुळे मनोरंजन क्षेत्राला महिनाभरात मोठा तोटा सहन करावा

लागला,'असं शाहरूख खान म्हणतो.

सिंगल स्क्रीन थिएटर्सवर या चलनतुटवड्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतोय.या महिन्याभरात रिलीज झालेल्या सगळ्याच चित्रपटांना याचा त्रास सहन करावा लागला.मात्र या बादशहाला वाटतंय की येत्या काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल.

Loading...
Loading...

बुधवारी ट्रेलर लॉचच्या सोहळ्यात शाहरूख पत्रकार परिषदेत म्हणाला की,'अशा निर्णयांनंतर परिस्थिती सुरळीत व्हायला थोडा वेळ लागतो.चलनतुटवडा असताना लोक कधीही मनोरंजनाला प्राधान्य देत नाहीत.

अशावेळी मुख्य गरजांना प्राधान्य दिलं जातं आणि चैनीच्या गोष्टी थांबवल्या जातात.'डिअर जिंदगी'च्या वेळी गोष्टी नियंत्रणाखाली येत असल्याचं आम्हाला दिसून आलं.लोक पुन्हा थिएटर्समध्ये पैसे खर्च करतायत, म्हणजे परिस्थिती सकारात्मक आहे,अनुकूल आहे.'

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानच्या 'रईस'चा ट्रेलर प्रेक्षकांची पसंती मिळवतोय.'रईस' येत्या 26 जानेवारीला रिलीज होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2016 01:49 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close