मुंब्य्रातील आणखी एक तरुण आयसिसच्या वाटेवर

मुंब्य्रातील आणखी एक तरुण आयसिसच्या वाटेवर

  • Share this:

ISISI Attack

09 डिसेंबर : कल्याणमध्ये काही तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेत सामिल झाल्याच्या घटनेला वर्षही होत नाही तोच ठाण्यातील आणखी एक तरुण आयसिसमध्ये सामिल झाल्याचं माहिती मिळालीये. या 24 वर्षीय तरुणाचे नाव नूर मोहम्मद तबरेज तांबे असं असून या प्रकरणाचा ठाणे एटीएस तपास करत आहे.

नोकरीसाठी जातो, असं सांगून तरबेज इजिप्तला गेला. त्यानंतर आजतागायत त्याचा एकही फोन आला नाही. त्याला वारंवार फोन केल्यानंतरही त्याचा फोन लागत नसल्याचं त्याच्या भावाने सांगितलं. तरबेज एकटाच गेला नसून मुंब्रा इथल्या अली नावाचा त्याचा मित्रही त्याच्या सोबत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अलीच्या प्रभावाखाली येऊनच तरबेजने आयसिसची वाट धरल्याचेही सांगण्यात येते. दोघेही उच्चशिक्षित असून हे दोघेच आयसिसला गेले कि त्यांच्या सोबत आणखी कोणी आहे, याबाबतचा एटीएस तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 9, 2016, 9:05 AM IST

ताज्या बातम्या