सिगारेट दिली नाही म्हणून दारुड्यांनी बार फोडला

सिगारेट दिली नाही म्हणून दारुड्यांनी बार फोडला

  • Share this:

ulhasnagar_bar08 डिसेंबर : सिगारेट दिली नाही या क्षुल्लक कारणावरुन काही दारुड्या तरुणांनी एका बारची तोडफोड केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.

उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 4 मध्ये हरेश बार आहे. या बारमध्ये काही तरुण दारू प्यायला बसले होते. त्यांनी बारच्या मॅनेजरकडे सिगारेट मागितली. त्याला बारमालकानं नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या तरुणांनी बार मालकाला मारहाण करत बारची तुफान तोडफोड केली. अवघ्या मिनिटभरात एका बारचं होत्याचं नव्हतं झालं. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 08:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading