जिराफ नामशेष होण्याचा धोका

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 8, 2016 06:28 PM IST

जिराफ नामशेष होण्याचा धोका

giraffe new

08डिसेंबर : तुम्हाला आफ्रिकेतल्या जंगलात जाऊन जिराफ पाहायला असेल तर काही काळाने ते अशक्य होणार आहे. कारण जिराफ हा प्राणी हळुहळू नामशेष होत चाललाय.इंटरनॅशनल युनियन फॉर द कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर या संस्थेने जाहीर केलेली

जिराफबद्दलची आकडेवारी धक्कादायक आहे.

1985 मध्ये आफ्रिका खंडात जिराफची संख्या 1 लाख 55 हजार होती. पण नंतरच्या 30 वर्षांत ही संख्या 97 हजार वर आली. जिराफच्या वसतिस्थानाला निर्माण झालेला धोका, शिकार आणि आफ्रिका खंडातली अशांत स्थिती याला कारणीभूत आहे. मध्य आफ्रिकेमध्ये जिराफची संख्या काही प्रमाणात वाढतेय पण एकूण आकडेवारीमध्ये मात्र प्रचंड घट आहे.

तुम्ही आफ्रिकेमध्ये जंगल सफारीसाठी गेलात तर जिराफ मोठ्या संख्येने पाहायला मिळतात पण येत्या काही वर्षांत त्यांची संख्या धक्कादायकरित्या घटू शकते. उत्तर केनिया, सोमालिया, इथिओपिया आणि दक्षिण सुदानच्या सीमेवर युद्धग्रस्त भागात जिराफची संख्या कमी होतेय.

Loading...

जिराफ हा खरंतर अत्यंत उत्कंठा बाळगणारा, झाडा-झुडपांच्या पाल्यावर जगणारा प्राणी. या प्राण्याच्या या स्वभावामुळेच तो शिकारी टोळ्यांना बळी पडतोय. याशिवाय जिराफाच्या झुडपी जंगलांच्या वसतिस्थानांवर शेतीचं अतिक्रमण होत चाललंय. त्यामुळे काही भागांत जिराफची संख्या कमी होतेय.

असं असलं तरी यावर उपाय काढण्याचा प्रयत्न वन्यजीव संशोधक करतायत. यासाठी दक्षिण आफ्रिकेमधल्या वन्यजीव व्यवस्थापनाचं उदाहरण सांगितलं जातं. दक्षिण आफ्रिकेमध्ये जिराफसाठी वेगवेगळी संवर्धन क्षेत्रं तयार करण्यात आलीयत. या क्षेत्रांमध्ये जिराफ निर्धोकपणे फिरू शकतात. शिवाय वन्यजीव पर्यटनही भरभराटीला आलंय.

आफ्रिका खंडातल्या अशांत आणि युद्धग्रस्त भागात मात्र जिराफचं संवर्धन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 06:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...