...आणि त्याला आला 5,55,55,555.00 जमा झाल्याचा मेसेज

...आणि त्याला आला 5,55,55,555.00 जमा झाल्याचा मेसेज

  • Share this:

kopar_gaon07 डिसेंबर : नोटाबंदीच्या या गोंधळात अचानक तुमच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाले तर...साहजिकच आपली कुणाला यावर विश्वास बसणार नाही. पण अहमदनगरच्या कोपरगावमधल्या स्वप्नील बोरावकेच्या खात्यात थोडेथोडके नाहीतर तब्बल 5 कोटी 55 लाख रुपये जमा झाले होते.

कोपरगावच्या स्वप्नील बोरावके या तरूणाच्या खात्यात साडेपाच कोटी जमा झाल्याचा मेसेज आला. त्याआधी स्वप्नीलच्या खात्यात फक्त 1495 रुपयेच शिल्लक होते. पैसै जमा झाल्याचा मेसेज आल्यावर त्यानं एटीएममध्ये जाऊन खात्री केली. त्यानंतर तो त्याचं खातं असलेल्या स्टेट बँकेच्या शाखेत गेला. त्यानंतर त्याच्या खात्यात 5 लाख 50 हजार रुपयेच शिल्लक राहिले. नेमकं काय घडलं याची विचारणा बँक अधिका•-यांकडे केली असता अधिका-यांनी त्याला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि एका को-या फॉर्मवर सही करायला सांगितलं. स्वप्नीलनं याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 7, 2016, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading