News18 Lokmat

रॅम्प वॉक? नको रे बाबा-आमिर खान

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2016 01:39 PM IST

रॅम्प वॉक? नको रे बाबा-आमिर खान

07 डिसेंबर: नुकताच आमिर खान एका फॅशन कार्यक्रमात आला होता. त्यावेळी आपल्याला रॅम्प वॉक करायला आवडत नाही, असं तो म्हणाला.

आमिर खान म्हणाला, 'मला रॅम्प वॉक आवडत नाही. कारण त्यात तिरपं चालावं लागतं.आणि त्यावेळी सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे असतं.' आमिर पुढे म्हणाला की त्यानं सलमान खानच्या बिइंग ह्युमनसाठी रॅम्प वॉक केला होता.' मी रॅम्प वॉकपासून खूप दूर राहतो. तिथे असलो तर मी कुठेतरी लपावं असं मला वाटतं.'

51 वर्षाचा आमिर म्हणाला, 'मी फॅशनपासून बराच लांब आहे. सगळे म्हणतात, मला फॅशन सेन्स नाहीय. म्हणूनच मी कुठलाही पोशाख करतो.'

आमिर सध्या 'दंगल'चं प्रमोशन करण्यात बिझी आहे. या कार्यक्रमाच्या वेळी तो म्हणाला,' माझ्या दंगलमधल्या मुली सान्या आणि फातिमा यांना फॅशन सेन्स भरपूर आहे.दोघीही मला बरेच सल्ले देत असतात.'

Loading...

'दंगल' सिनेमा पाहिल्यावर तुम्ही मला विसरून जाल आणि त्या दोघींना लक्षात ठेवाल, असंही तो म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2016 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...