मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी फेब्रुवारीत

मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी फेब्रुवारीत

  • Share this:

nagar_maratha

07 डिसेंबर - मराठा आरक्षणाबद्दलची पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. त्यानंतर आता पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. आजच्या सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

आजच्या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने मराठा समाजाबद्दलचे प्रतिज्ञापत्रक  कोर्टासमोर सादर केलं. 80 टक्क्यांहून अधिक मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, असं प्रतिज्ञापत्र सरकारकडून सादर करण्यात आलं. कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, असा दावाही सरकारकडून प्रतिज्ञापत्रात करण्यात आला. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. मात्र हायकोर्टाने मराठा आरक्षणाची सुनावणी फेब्रुवारीत होणार असल्याचं सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 7, 2016, 2:09 PM IST

ताज्या बातम्या