'2.0'च्या सेटवर रजनीकांतना दुखापत

'2.0'च्या सेटवर रजनीकांतना दुखापत

  • Share this:

rajinikath

05 डिसेंबर : सुपरस्टार रजनीकांतना तामिळ साय-फाय सिनेमा '2.0'चं शूट करत असताना दुखापत झाली. रजनीकांत शूटिंगच्या दरम्यान पडले आणि त्यांना दुखापत झाली.

सूत्रांकडून कळलेल्या माहितीप्रमाणे एक महत्त्वाचा सीन शूट करत असताना रजनीकांत पडले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्या गुडघ्यांना दुखापत झालीय. पण उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलंय. रजनीकांत यांची तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे.

'2.0'चं दिग्दर्शन शंकर करतायत. या बिग बजेट सिनेमाचं बजेट आहे 400 कोटी रुपये.

सिनेमात अक्षय कुमार,ॲमी जॅक्सन,शंतनू पांडे,आदिल हसन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अक्षय कुमार शास्त्रज्ञाच्या भूमिकेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2016 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...