उद्धव ठाकरे मोहन भागवतांच्या भेटीला

उद्धव ठाकरे मोहन भागवतांच्या भेटीला

  • Share this:

uddhav_meet_mohan_bhagwat05 डिसेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतलीये. संघमुख्यालयात जाऊन उद्धव ठाकरेंनी ही भेट घेतली.

दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा आज विवाह सोहळा आहे. या सोहळ्याला उपस्थिती राहण्यासाठी उद्धव ठाकरे नागपुरात दाखल झाले आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी संघमुख्यालयात मोहन भागवत यांची भेट घेतली. तासभर दोघांमध्ये चर्चा झालीय. नोटाबंदीवर उद्धव ठाकरे आणि मोहन भागवत यांच्यात चर्चा झाल्याचं कळतंय. भाजप-सेना संबंधांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मोहन भागवत यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 4, 2016, 2:33 PM IST

ताज्या बातम्या