साईंच्या चरणी तब्बल 9.5 कोटी जमा, 500-1000 च्या नोटा

साईंच्या चरणी तब्बल 9.5 कोटी जमा, 500-1000 च्या नोटा

  • Share this:

sai_baba_500_100003 डिसेंबर : नोटाबंदीनंतर गेल्या 24 दिवसांत साईबाबांच्या दानपेटीत तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचं दान भक्तांनी टाकलंय. या दानात हजार रूपयांच्या 1 कोटी 27 लाखाच्या नोटा तर 500 रूपयांच्या 1 कोटी 57 लाखाच्या नोटांचा समावेश आहे..

आठ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिर्डीच्या साईमंदिरात रोख स्वरूपात हजार पाचशेच्या नोटा स्विकारणं बंद केलं होतं. मात्र, भक्तांनी दानपेटीत नोटबंदीनंतरही हजार पाचशेच्या नोटा टाकल्या आहेत. त्यात हजाराच्या नोटांचे 1 कोटी 27 लाख तर पाचशेच्या नोटांचे 1 कोटी 57 लाख असे एकंदरीत 2 कोटी 84 लाखाच्या हजार पाचशेच्या नोटा बाबांच्या दानपेटीत मिळाल्या आहेत. ही सर्व रक्कम शिर्डीतील बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

दरम्यान, आयकर विभागानेही संस्थानला त्यांच्याकडे आलेल्या नोटांचा हिशेब मागितला आहे. तोही साईसंस्थान लवकरच सादर करणार असल्याचं कार्यकारी अधिकार्यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 3, 2016, 8:03 PM IST

ताज्या बातम्या