03 डिसेंबर : टोेलमाफीनंतर देशभरात टोलवसुली सुरू झाली आहे. मात्र, सुट्टेपैशांच्या टंचाईमुळे मुंबईतील सर्वच टोलनाक्यांवर टोलगर्दी झालीये. आज दुपारी मनसे कार्यकर्त्यांकडून वाशी टोल बंद करण्याचा प्रयत्न झाला पण वाशी पोलिसांनी तो हाणून पाडला.
मुंबई शहरातल्या सर्व टोलनाक्यांवर आज मोठी वाहतूक कोंडी आहे. सकाळपासूनच लोकांचे हाल होतायेत. कालपर्यंत टोल माफ होता. पण काल मध्यरात्रीपासून टोल पुन्हा सुरू झाला, आणि मोठ्या रांगा लागल्या. सुट्टे पैशांचा प्रॉब्लेम अजूनही आहे.
दुसरं म्हणजे टोल नाक्यांवर स्वाईप मशीन्स ठेवण्यात आलीयेत. जे लोक कार्ड स्वाईप करतायेत, त्यांना जास्त वेळ लागतोय. तिसरं म्हणजे टोल कर्मचारी आणि वाहन चालकांमध्ये सुट्ट्या पैशावरून वाद होतायेत.
मुलुंड, ऐरोली, वाशी आणि दहिसर या चारही टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यांवर हल्लाबोल केला. वाशी टोल नाका बंद पाडण्याचा मनसेसैनिकांनी प्रयत्न केला. पण, आधीच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. (संग्रहित छायाचित्र)
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv