नोटांच्या हेराफेरी प्रकरणी पंढरपूर विठ्ठल देवस्थानला IT ची नोटीस

नोटांच्या हेराफेरी प्रकरणी पंढरपूर विठ्ठल देवस्थानला IT ची नोटीस

  • Share this:

pandharpur02 डिसेंबर : दानपेटीतल्या नोटांच्या हेराफेरीच्या आरोपाप्रकरणी आयकर विभागाने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर संस्थानाला नोटीस बजावलीये.

कार्तिकीवारी दरम्यान मंदिराच्या देणगी पेटी मध्ये जमा झालेल्या 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे आणि त्याठिकाणी 1000 आणि 500 च्या नोटांची संख्या वाढल्याची बातमी आयबीएन लोकमतने पुराव्यासह दाखवली होती. या गंभीर प्रकरणाची दखल आता थेट आयकर विभागानं घेतलीये.

खरंतर जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करणं अपेक्षित होतं. पण गेल्या आठवडाभरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने पुणे आयकर विभागाने 30 नोव्हेंबर रोजी आपल्या अधिका-यामार्फत नोटीस बजावली आहे. त्यामध्ये नोटाबंदी नंतरचा सर्व आर्थिक ताळेबंद सादर करण्याचे निर्देश समितीला देण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 09:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading