500 ची नोट उद्या फक्त कागद, आज कुठे वापरता येणार ?

500 ची नोट उद्या फक्त कागद, आज कुठे वापरता येणार ?

  • Share this:

500 note3302 डिसेंबर : नोटाबंदीनंतर आता 1000 च्या नोटापाठोपाठ 500 च्या नोटाही इतिहासजमा होणार आहे. आज 500 च्या नोटा स्वीकारण्याचा अंतिम दिवस आहे. उद्यापासून जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाही.

आज पेट्रोल पंप आणि विमानतळावर 500 च्या जुन्या नोटा चालण्याची आजची शेवटची तारीख आहे. सरकारनं ही तारीख आधी 15 डिसेंबर ठेवली होती, पण आता ही तारीख 2 डिसेंबर करण्यात आलीय. एक हजारच्या नोटा स्वीकारणं याआधीच बंद झालंय. आता हजारची नोट तुम्ही फक्त बँकेत बदलून घेऊ शकता. आजपासून 500च्या नोटांचंही तसंच होईल.

कुठे चालतीलआणि कुठे चालणार नाहीत ?

जुन्या पाचशेंच्या नोटांवर आता

पेट्रोल, डिझेल खरेदीचा शेवटचा दिवस

एअर तिकिटांसाठीही आता जुन्या

पाचशेच्या नोटा चालणार नाहीत, आज शेवट

गॅस सिलिंडर खरेदीसाठी जुन्या

पाचशेच्या नोटा वापरता येतील

सरकारी दवाखाने, मेडिकलमध्ये

जुन्या पाचशेच्या नोटा चालतील

रेल्वे तिकिट खरेदीसाठीही जुन्या

नोटा चालतील

टोलसाठी प्री पेड कुपन्स घेण्यासाठी

जुन्या पाचशेच्या नोटा चालतील

15 डिसेंबरपर्यंत वीज बिल भरण्यासाठी

जुन्या नोटा चालतील

पाणी कर आणि प्रॉपर्टी कराबाबत

कुठलेही निर्देश नाहीत

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: December 2, 2016, 5:18 PM IST

ताज्या बातम्या