मराठा क्रांती मोर्चाला पी.बी. सावंत यांची सोडचिठ्ठी !

मराठा क्रांती मोर्चाला पी.बी. सावंत यांची सोडचिठ्ठी !

  • Share this:

pb_swant_02 डिसेंबर : निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी मराठा क्रांती मोर्चामधून अंग काढून घेतलंय. समितीवर न विचारता नेमणूक केली, व्यापक हिताच्या दृष्टीने विचार करून मी ती स्वीकारलीही.पण मला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहे असं सावंत यांनी स्पष्ट केलं.

तसंच निवेदनं प्रसिद्ध केली जातायेत. मी या सगळ्याशी असहमत आहे असं सावंत यांनी म्हटलंय. याच कारणानं त्यांनी मराठा क्रांती मोर्चातून अंग काढून घेतलंय.

 निवृत्त न्या. पी.बी. सावंत यांचं निवेदन

"दिनांक 9 ऑक्टोबर 2016 रोजी औरंगाबाद येथे झालेल्या क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या राज्यव्यापी बैठकीत जी समिती नेमण्यात आली त्यात माझे नाव समाविष्ट केले गेले ते मला न विचारता. असे असूनही लोक भावनेचा आदर करण्याकरिता आणि मोर्च्याच्या मागण्यावर निरनिराळ्या समाज समुहात समन्वय साधून काही विधायक उपाय काढता यावा म्हणून त्यावेळी मी या माझ्या नियुक्ती विरुद्ध काहीही निवेदन काढले नाही. आणि समितीचे कार्य योग्य रीतीने यशस्वीपणे पार पडेल अशी अपेक्षा केली.

परंतु, या समितीच्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा झाली आणि निर्णय घेण्यात आले त्याची मला बिलकुल कल्पना नाही. तसंच हे निर्णय मला केव्हाही कळवण्यात आले नाहीत. आता असे समजते की, या समितीने काही निर्णय घेतले आहेत आणि त्याचे 26 पानांचे निवेदन मुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. मी ना या निर्णयांशी ना त्या निवेदनाशी सहमत आहे."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 04:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading