अहमदनगरमधून 38 लाखाच्या जुन्या नोटा जप्त

अहमदनगरमधून 38 लाखाच्या जुन्या नोटा जप्त

  • Share this:

Note Currency123

02 डिसेंबर : अहमदनगर शहरात पोलिसांनी कारवाई करत एक हजार रुपयांच्या 38 लाख 50 हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. या नोटा कुठून, कशा आल्या याची चौकशी पोलीस करत आहेत.

नगर शहरातील महावीरनगर इथे राहुल भंडारी हा नोटाने भरलेली एक बॅग घेऊन जात होता. रात्री पेट्रोलींग करत असताना पोलिसांनी भंडारीची चौकशी केली आणि बॅग तपासली. त्यात एक हजार रुपयांच्या 38 लाख 50 हजार रुपयांचा नोटा आढळून आल्या. भंडारी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने हे पैसे कुठून आणले याचा तपास सुरू असल्याची माहिती तोफखाना पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, हैदराबाद पोलीसांनी देखील 98 लाख 18 हजार रुपये जप्त केलेत. जप्त केलेल्या रकमेत 2000च्या नवीन नोटा आणि 100 रूपयांच्या नोटा होत्या. तर या प्रकरणी पोलीसांनी 5 लोकांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2016 03:13 PM IST

ताज्या बातम्या