02 डिसेंबर : भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात काही अज्ञातांनी केलेल्या खोडसाळ पोस्टरबाजीवरुन भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी निशाना साधला आहे. "चिल्लर लोकच चिल्लरपणा करणार", असा टोला शेलार यांनी आज लगावला आहे.
दोन दिवसापूर्वी पार पडलेल्या नगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवून भाजप नंबर एकचा पक्ष ठरला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपाने स्वबळावर लढायला हवी. शिवसेनेशी युती करण्याची काही गरज नसल्याचे वक्तव्य किरीय सोमय्या यांनी केलं होतं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv