आबांच्या कुटुंबियांच्या हातातून तासगावची सत्ता गेली

  • Share this:

r r patil ibnlokmat.tv new (5)28 नोव्हेंबर : नेता सोडून गेला की कार्यकर्तेही सोडून जातात याचाच अनुभव राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांच्या कुटुंबीयांना आलाय. तासगावमध्ये राष्ट्रवादी आणि पर्यायानं आर.आर.पाटील यांच्या कुटुंबीयांच्या हातातून सत्ता गेलीये.

तासगावमध्ये भाजपला 13 जागा मिळाल्या आहे. तर राष्ट्रवादीला अवघ्या 8 जागा मिळाल्या. शिवाय भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजय सावंत विजयी झाले आहे. राष्ट्रवादीकडून सुमन पाटील हे मैदानात उतरले होते.

21 जागांपैकी भाजपने 13 जागा पटकावल्या तर राष्ट्रवादीला 8 जागांवर समाधान मानावे लागले. आतापर्यंत नगरपरिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दुर्लक्षामुळे तासगावातून सत्ता गमवावी लागलीये.

तासगाव नगरपालिका

नगराध्यक्ष- विजय सावंत ( भाजप )

बलाबल एकूण जादा 21

भाजप - 13

राष्ट्रवादी काँग्रेस 8

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 09:08 PM IST

ताज्या बातम्या