प्रसिद्ध तारांकित चेहरे आता इंडियन सुपर लीग संघांचे मालक !

प्रसिद्ध तारांकित चेहरे आता इंडियन सुपर लीग संघांचे मालक !

  • Share this:

isl_sachin_abhishek28 नोव्हेंबर : मैदानातील प्रत्यक्ष कामगिरी आणि बड्या सेलेब्रिटी खेळांडूंचा सहभाग यामुळे इंडियन सुपर लीग वलयांकित बनत असून या लीगची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत वाढू लागली आहे.

फुटबॉल लीगची कल्पना जशी समोर आली, तसे जगभरातील सर्वोत्कृष्ट अशा अनेकांची पुढाकार घेतला. या साऱ्यांच्या स्वप्नातील या प्रकल्पाकरता समाजाच्याही विविध स्तरांतील नामांकित व्यक्ती पुढे आल्या. इंडियन सुपर लीग संघाची मालकी असलेल्या नामांकित व्यक्तींची यादी पुढीलप्रमाणे आहे.

  • सचिन तेंडुलकर – भारताच्या क्रीडा क्षेत्राचा सर्वात नावाजलेला चेहरा असलेला इंडियन सुपर लीगमध्ये सहभागी झाला आहे. केरळ ब्लास्टर्स फ्रॅन्चायझीमध्ये सचिन तेंडुलकर सहमालक आहे.

  • सौरव गांगुली – फुटबॉलवर अतोनात प्रेम करणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली अटलेटिको दि कोलकाता संघाचा एक लोकप्रिय चेहरा आहे, त्यासोबत सौरव या संघाचा सहमालकही आहे. उद्घाटनीय सामन्यांच्या दरम्यान एटीकेच्या प्रचारमोहीमेत सौरव उपस्थित होता आणि त्यांचा संघ विजयी ठरल्यानंतर सौरवने संघासोबत विजय साजराही केला होता.

  • रणबीर कपूर – हिंदी चित्रपटसृष्टीतील आजचा चॉकलेट चेहरा गणल्या जाणारा रणबीर कपूर हा मुंबई सिटी एफसी फुटबॉल टीमचा सहमालक आहे. आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये आपल्या संघाचे मनोबल वाढविण्यासाठी रणबीर प्रयत्न करताना सातत्याने दिसला.

  • जॉन अब्राहम – बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम हादेखील फुटबॉलचा मोठा चाहता आहे. जॉन सध्या देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये फुटबॉलचा प्रचार करीत आहे. जॉन अब्राहम हा नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी टीमचा मालक असून आपल्या टीमचा चेहरा बनला आहे.

  • विराट कोहली – भारतीय क्रिकेट जगताची सध्या ‘दिल की धडकन’ असलेला विराट हा एफसी गोवा फुटबॉल टीमचा सहमालक आहे. विराट अनेकदा स्टँडमध्ये आपल्या संघाचे मनोबल वाढविण्याचे प्रयत्न करताना दिसला. गोव्यातील सामन्यांदरम्यान विराटसोबत त्याची प्रेयसी- अभिनेत्री अनुष्का शर्माही उपस्थित होती.

  • अभिषेक बच्चन - अभिनेता अभिषेक बच्चन हादेखील क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभागी झाला आहे. चेन्नईयीन एफसी संघाचा तो सहमालक आहे आणि लीगच्या दुसऱ्या मालिकेतील सामन्यांमध्ये त्याच्या संघाला मिळालेली विजयश्री साजरी करताना तो दिसला होता.

  • हृतिक रोशन – बॉलिवूडचा हा बडा तारा एफसी पुणे सिटीचा सहमालक असून त्याच्या पडद्यामागच्या व्यक्तिमत्वाला अनुसरून आपल्या संघाची पाठराखण करताना तो फारसा नजरेस पडला नाही, मात्र हृतिक त्याच्या संघाच्या प्रमोशनल कॅम्पेनमध्ये सहभागी झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 28, 2016, 7:37 PM IST

ताज्या बातम्या