नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपला 'अच्छे दिन', राष्ट्रवादीची पिछेहाट

नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपला 'अच्छे दिन', राष्ट्रवादीची पिछेहाट

  • Share this:

cm_fadanvis_nagarpalika28 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता मिळवल्यानंतर भाजप स्थानिक निवडणुकीत छाप पाडू शकणार नाही अशी शक्यता असताना नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारलीये.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले असून भाजपने सर्वाधिक 52 जागा पटकावल्या आहे.  तर काँग्रेसने 17 जागा जिंकून जोरदार कमबॅक केलंय. तर राष्ट्रवादीने जास्त जागा जिंकूनही 9 ठिकाणीच नगराध्यक्षपद पटकावता आले आहे.

देवेंद्र सरकारने सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या ख•या पण स्थानिक पातळीवर भाजपला सत्तेसाठी वाटाघाटी करावी लागली. स्थानिक निवडणुकीत भाजपला किती जागा मिळतील असा प्रश्न निर्माण विचारला जात होता. त्यामुळे नगरपरिषदेची निवडणूक ही मिनी विधानसभा म्हणून पाहिली जात आहे.

आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजप अपक्षेप्रमाणे पिछाडीवर गेली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुसंडी घेत आघाडी घेतली. मात्र, दुपारनंतर भाजपने जोरदार उसळी घेत दोन्ही पक्षांना मागे टाकलं.

अनेक ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले पण नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला यश आलं. तब्बल 52 नगराध्यक्ष निवडून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मातृभूमी भाजपचे तब्बल 17 नगराध्यक्ष निवडून आले. खान्देशमधून 7, पश्चिम महाराष्ट्रात 5, मराठवाडा आणि कोकणात प्रत्येकी 2 जागी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहे. भाजपच्या यशामुळे स्थानिक निवडणुकीतही देवेंद्र सरकारने जनमतचाचणी पास झाल्याचं चित्र आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुणी किती जागा जिंकल्यात ?

भाजपचे सर्वाधिक 52 नगराध्यक्ष

काँग्रेसचे 17 नगराध्यक्ष

शिवसेनेचे 18 नगराध्यक्ष

राष्ट्रवादीचे 9 नगराध्यक्ष

आघाड्या आणि अपक्ष 23 नगराध्यक्ष

खान्देश

- पारोळा, जळगाव : करण पवार, भाजप

- दोंडाईचा, धुळे - नयनकुवर रावल, भाजप

- येवला - बंडू क्षीरसागर, भाजप

- शहादा, नंदुरबार - मोतीलाल पाटील, भाजप

- एरंडोल - रमेश परदेशी, भाजप

- फैजपूर - महानंदा होले, भाजप

- शेगाव, बुलडाणा - शकुंतला बूच, भाजप

विदर्भ

- देवळी, वर्धा - सुचिता मडावी, भाजप

- वर्धा नगरपरिषद - अतुल तराळे, भाजप

- तेल्हारा, अकोला - जयश्री फुंडकर, भाजप

- मूल, चंद्रपूर - रत्नमाला भोयर, भाजप

- आर्वी, वर्धा - प्रशांत सव्वालाखे, भाजप

- वरोरा, चंद्रपूर - ऐहतेशाम अली, भाजप

- वरोरा, चंद्रपूर - ऐहतेशाम अली, भाजप

- दर्यापूर, अमरावती - नलिनी प्रकाश भारसाकळे - भाजप

- कारंजा - प्रकाश ढोके, भाजप

- देऊळगाव राजा - सुनीता शिंदे, भाजप

- उमरखेड - नामदेव ससाणे, भाजप

- मूर्तीजापूर - मोनाली गावंडे - भाजप

- मोरशीनगर - शीला रोडे, भाजप

- अकोट - हरिनारायण माकोडे - भाजप

- दिग्रस - सदफजहाँ जावेद पहेलवान - अपक्ष

- वणी - कारेंद्र बोरडे - भाजप

- शेंदुरजना घाट - रूपेश मांडवे - भाजप

मराठवाडा

- गेवराई, बीड - सुशील जवंजाळ, भाजप

- धारूर, बीड - डाँ स्वरूपसिंह हजारी, भाजप

कोकण

- वेंगुर्ला - राजन गिरप - भाजप

- चिपळूण - सुरेखा खेराडे - भाजप

पश्चिम महाराष्ट्र

- राहाता, नगर - ममता पिपाडा, भाजप

- तासगाव, सांगली - विजय सावंत, भाजप

- दुधनी, सोलापूर - भीमाशंकर इंगळे, भाजप

- देवळाली प्रवरा - सत्यजित कदम - भाजप

- अक्कलकोट - शोभा खेडगी - भाजप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 28, 2016, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading