कोकणात नारायण राणेंचं कमबॅक, देवगडपाठोपाठ सावंतवाडीतही राणेंची सत्ता

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2016 04:38 PM IST

rane on vidhan parishad28 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जाणाऱ्या नारायण राणे अखेर विजयी सूर गवसलाय. नगरपालिका निवडणुकीत नारायण राणे यांनी पराभवाचा वचपा काढत दीपक केसरकारांना धोबीपछाड दिलाय. राणेंच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 8 जागांवर काँग्रेसने विजय मिळवलाय.

सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी 17 पैकी 8 जागांवर विजय मिळवत सिंधुदुर्ग जिह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना चांगलाच धक्का दिला. शिवसेनेला 7, भाजपला 1 आणि अपक्ष उमेदवाराला 1 जागा मिळाली आहे. केसरकर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांनी 17 पैकी 17 जागांवर एकहाती विजय मिळवला होता. तर देवगड नगरपालिकेत काँग्रेसने 10 जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष ठरलाय.  राष्ट्रवादी, शिवसेनेला प्रत्येकी 1 जागेवर समाधान मानावे लागले.

दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले ही घोडचूक होती, असा घरचा अहेर नारायण राणेंनी नेत्यांना दिलाय. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली असती तर नगरपालिकांमध्ये सगळीकडे नक्कीच आघाडीची सत्ता आली असती, असंही नारायण राणेंनी म्हटलंय. तसंच नगराध्यक्ष काँग्रेसचाच होईल असं सांगत अपक्ष उमेदवाराला सोबत घेण्याचे संकेत राणेंनी दिले.

तर युती झाली असती तर विजय आमचा झाला असता असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. मी आणि मुख्यमंत्र्यांनी युतीसाठी खूप प्रयत्न केले. पण स्थानिक पातळीवर युती नको होती. यासाठी मी कोणाला दोष देत नाही, पण भाजप-सेना एकत्र झाली असती तर आम्ही जिंकलो असतो, अशी खंत केसरकरांनी बोलून दाखवली. तसंच हा छोटा फटका असून, जनतेने हा संदेश दिलाय असंही केसरकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 04:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...