LIVE : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात

	 LIVE : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात

  • Share this:

// ]]>

========================================================

election_janmat_Chachani28 नोव्हेंबर : राज्यातल्या 25 जिल्ह्यातल्या 147 नगरपरिषद आणि 17 नगरपंचायतींसाठी आज मतमोजणी होणार आहे. तुरळक प्रकार वगळता राज्यात काल शांततेत मतदान पार पडलं. सरासरी 70 टक्के मतदान झालंय. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.164 नगर परिषदांचे निकाल लागणार आहे. पहिला कल सकाळी 10 वाजता हाती येण्याची शक्यता आहे.

राज्याची मिनी विधानसभा मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ख-या अर्थानं ही जनमत चाचणी असणार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. या निवडणुकीसाठी जवळपास संपूर्ण मंत्रिमंडळानं प्रचारासाठी राज्य पिंजून काढलं होतं. तर विरोधकांनीही सत्ताधा•यांना शह देण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीये.

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणा-या नगरपालिकांसाठी रविवारी राज्यभरात ठिकठिकाणी पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं.एकूण 146 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी हे मतदान झालं. या नगरपालिकांच्या निवडणुका खरंतर अनेक ठिकाणी स्थानिक आघाड्या करूनच लढल्या जातात. पण यावेळी नगराध्यक्षपदाची निवडणूक थेट मतदारांमधून होत असल्याने पक्षीय पातळीवरही निवडणुकीला महत्व आलं होतं.

विशेषतः सत्ताधारी भाजपसाठी एकाअर्थाने जनमत चाचणीच मानली जातेय. म्हणूनच मुख्यमंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळच प्रचाराच्या रिंगणात उतरलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तालुका पातळीवरचे दिग्गज नेतेमंडळीही आपआपल्या बालेकिल्ल्यांमधली सत्ता राखण्यासाठी झटत होते. त्यामुळेच अनेक ठिकाणी सत्ताधारी नेत्यांविरूद्ध सर्वपक्षीय विरोधक आघाडी-युती विसरून एकत्र आल्याचं बघायला मिळालं.

याच रस्सीखेचीतून काही ठिकाणी वादावादीचेही प्रकार घडले.अमळनेरमध्ये तर मारहाणीचाही प्रकार घडला. तर साता-यात स्थानिक भाजप नेत्याने थेट महिला पोलिसालाच दमबाजी केली.तासगाव आणि यवतमाळमध्येही किरकोळ मारामारीचे प्रकार घडले चंद्रपूरमध्ये तर एका बाबाराव नावाचा उमेदवार मतदानाचं आवाहन करण्यासाठी चक्क टॉवरवरच चढल्याचं बघायला मिळालं.

तर परळीत विधान परिषदेचे विरोधीनेते धनंजय मुंडे यांनी चक्क बुलेटवरून रपेट मारली...पाहुयात आता परळीतली जनता मुंडे बहिण-भावापैकी नेमकी कोणाच्या हातात सत्तेच्या चाव्या देतेय ते...परळीप्रमाणेच बीडमध्येही क्षीरसागर काका-पुतणे आमनेसामने आले होते...इकडे रोह्यामध्येही तटकरे काका-पुतण्या पहिल्यांदाच परस्परांविरोधात मैदानात उतरल्याचं बघायला मिळालं.एकूणच सत्तेसाठी नेतेमंडळी रक्ताची नाती देखील विसरल्याचं या निवडणुकीत बघायला मिळालं...असो...पण या निवडणुकीत खरी प्रतिष्ठा पणाला लागलीय ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच...कारण नगराध्यक्षपदाची निवड थेट पद्धतीने करण्याचा हा निर्णय त्यांचाच आहे.त्यामुळे मतदानाची वाढीव टक्केवारी राज्यातल्या सत्ताधा•यांविरोधात की स्थानिकपातळीवरच्या सत्ताधा•यांविरोधात हे निकालानंतरच स्पष्ट होईल..

नगरपालिकांचा कौल कुणाला?

2011चं बलाबल

राष्ट्रवादी - 916

काँग्रेस - 771

भाजपा - 298

शिवसेना - 264

मतांची वाढलेली टक्केवारी कुणासाठी धोकादायक ?

कोकण विभाग:

पालघर (3)- 80,

रायगड (9)- 88,

रत्नागिरी (5) - 88

सिंधुदुर्ग (4)- 67.

पुणे विभाग:

सातारा (14)- 83,

सांगली (8)- 84,

सोलापूर (9)- 73

कोल्हापूर (9)- 79.

नाशिक विभाग:

नाशिक (6)- 79,

धुळे (2)- 70,

नंदुरबार (1)- 74,

जळगाव (13)- 68

अहमदनगर (8)- 83.

औरंगाबाद विभाग:

जालना (4)- 59,

परभणी (7)- 76,

हिंगोली (3)- 68,

बीड (6)- 74

उस्मानाबाद (8)- 68.

अमरावती विभाग:

अमरावती (9)- 72,

अकोला (5)- 67,

बुलडाणा (9)- 79,

वाशीम (3)- 64,

यवतमाळ (8)- 60.

नागपूर विभाग:

वर्धा (6)- 60,

चंद्रपूर (5)- 63.

एकूण सरासरी- (164) - 70.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 28, 2016, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading