S M L

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Nov 28, 2016 08:45 AM IST

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचं निधन

२८ नोव्हेंबर : ज्येष्ठ साहित्यिक आणि लेखक आनंद यादव यांचं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ कोल्हापूर जिल्ह्यातील कागल इथं झाला. त्यांची झोंबी आणि घरभिंती  या कादंबरी गाजल्या.त्यांच्या  कादंबरीवर नटरंग हा सिनेमाही साकारला. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.  साहित्य प्रवासात त्यांच्या आयुष्याला वादाची किनारही होती.

आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ’संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर वारकऱ्यांनी आक्षेप घेतला.  त्यांमुळे २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून त्यांना वंचित राहावे लागले. एवढंच नाहीतर कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली होती. झोंबीकार या साहित्यकाने ऱाहत्या घरी प्राणज्योत मालवली. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2016 12:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close