26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

  • Share this:

26 11 8 years26 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या 26/11 च्या भीषण हल्ल्याला आज 8 वर्षं पूर्ण झाली.  या हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मरिन ड्राईव्ह इथल्या पोलीस जिमखानावर श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, उद्धव आणि आदित्य ठाकरे, पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरही उपस्थित होते.

गेट वे ऑफ इंडियावरचं हॉटेल ताजमहाल या हल्ल्याचा बळी ठरलं होतं. शहिदांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहिली.

या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरेंनी शहीद तुकाराम ओंबाळेंच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. 26/11च्या रात्री अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडणारे ओंबाळेच होते. कसाबच्या एके 47मधल्या कितीतरी गोळ्या स्वतः झेलून त्यांनी कसाबला पकडलं. इतक्या गोळ्या लागूनही त्यांनी कसाबवरची पकड सैल होऊ दिली नाही. त्यांच्या या शौर्यामुळे कसाब जगात जिवंत पकडला गेलेला पहिला अतिरेकी ठरला. कसाब जर गिरगाव चौपाटी पार करून पुढे गेला असता, तर आणखी अनेक जणांना आपले जीव गमवावे लागले असते. कसाबच्या जबाबामुळेच आपण पाकिस्तानचं पितळ उघडं पाडू शकलो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 26, 2016 10:46 AM IST

ताज्या बातम्या