S M L

मोदींच्या नोटाबंदी निर्णयावरुन आम्हीही धडे घेऊ, चीनकडून प्रशंसा

Sachin Salve | Updated On: Nov 26, 2016 01:40 PM IST

मोदींच्या नोटाबंदी निर्णयावरुन आम्हीही धडे घेऊ, चीनकडून प्रशंसा

26 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या मोदींच्या निर्णयाचं आता चीननंही कौतुक केलंय. चीनच्या सरकारी वृत्तपत्रात मोदींची प्रशंसा केली गेलीय. हा निर्णय अतिशय धाडसी आहे. यश किती मिळेल माहीत नाही पण सुरुवात तर झाली आहे असं कौतुक चीनच्या सरकारी वृत्तपत्रात केलंय.

चीनच्या ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये नोटाबंदीचं समर्थन करण्यात आलं. धोरणात्मक बदल हे नेहमीच कठीण असतात. त्यासाठी धाडसाबरोबरच इतर अनेक गोष्टी लागतात. हे जर चीनमध्ये झालं तर काय होईल याची कल्पनाही करता येत नाही. पण याची अंमलबजावणी भारत सरकारच्या हातातून निसटतेय का ? असंही या संपादकीय लेखात म्हणण्यात आलंय.

नेमकं या संपादकीयमध्ये काय ?

"नोटाबंदीचा मोदींचा निर्णय अतिशय धाडसी आहे. चीनमध्ये 50 आणि 100 युआनच्या नोटा बंद केल्या तर काय होईल याची कल्पनाच आम्ही करू शकत नाही. नोटाबंदीमध्ये जोखीमही आहे. याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल आणि जनताही पाठिंबा देईल हे मोदींनी गृहित धरलं. धोरणात्मक बदल हे नेहमीच कठीण असतात. त्यासाठी केवळ धाडस पुरेसं नसतं. मोदींनी हा निर्णय घेतला खरा पण त्याचं यश हे सक्षम अंमलबजावणी आणि जनतेच्या पाठिंब्यावर अवलंबून आहे. मोदी सरकारला ही जबाबदारी पार पाडता येईल का याबाबत अधिकाधिक लोक साशंक होतायेत. चीन तर गेली 40 वर्षं मोठे बदल करतंय. पण मोदींच्या या निर्णयावरून आम्हीही धडे घेऊ."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2016 01:40 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close