साताऱ्यातही मोदी कंदीपेढेवाला आहे, उदयनराजेंचा मोदींवर शाब्दिक सर्जिकल स्ट्राईक

साताऱ्यातही मोदी कंदीपेढेवाला आहे, उदयनराजेंचा मोदींवर शाब्दिक सर्जिकल स्ट्राईक

  • Share this:

udayan_Raje_modi25 नोव्हेंबर : 'मी कंदीपेढेवाला मोदी ओळखतो', 'मोदींमुळे देश आराजकतेच्या उंबरठ्यावर' आलाय अशा तिखट शब्दात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली आहे. तसंच नोटाबंदीमुळे शेतकरी देशोधडीला लागलाय असं म्हणत त्यांनी मोदींवर शाब्दिक सर्जिकल स्ट्राईक केलाय.

नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज विविध मान्यवरांनी कराड येथे प्रितीसंगम येथील समाधी स्थळावर आदरांजली वाहिली यावेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,खा उदयनराजे भोसले यांनी नरेंद्र मोदीच्या नोटाबंदीवर जोरदार टीका केली.

यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींशी बोलताना उदयनराजे यांनी नोटा बंदीचा निर्णय मुर्खपणाचा असल्याचं म्हटलंय. तसंच कोण मोदी आमच्याकडे ही मोदी कंदीपेढेवाले आहेत. दररोजच्या नोटाबंदी नियमामुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड उद्रेक आहे. मोदींना घाबरुन भाजपचे आमदार-खासदार चुकीच्या नोटाबंदी निर्णयाला विरोध करत नाहीत असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.

तर नरेंद्र मोदी अर्थतज्ञांच्या नव्हे रामदेव बाबांच्या सल्ल्याने चालतात अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 25, 2016, 10:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading