24 नोव्हेंबर : भारतात काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नोटबंदी करण्यात आली. पण परदेशातल्या काळ्या पैशाचं काय, असा प्रश्न विचारला जातो. यासाठी भारत सरकार प्रयत्न करतंय. स्विस बँकेमध्ये ज्या भारतीय नागरिकांची खाती आहेत त्याबद्दलची सगळी माहिती आता भारताला मिळणार आहे.
भारत आणि स्वित्झर्लंडने नुकताच याबद्दलचा करार केलाय. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT चे अध्यक्ष सुशील चंद्रा आणि भारतामधले स्वित्झर्लंडचे दूत गिल्स रॉड्युट यांनी या करारावर सही केलीय. या करारानुसार स्विस बँकेत ज्यांचं खातं आहे त्याची माहिती स्वयंचलित पद्धतीने भारत सरकारकडे येणार आहे.सप्टेंबर 2019 नंतर माहिती भारताला मिळू शकेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv