24 नोव्हेंबर: मुंबईत गिरगाव आणि काळबादेवी इथून जाणाऱ्या मेट्रो 3 प्रकल्पाच्या पत्र्यांवर अज्ञात लोकांनी काळं फासलं आहे.
काही दिवसांपूर्वीच मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पण या मेट्रो 3 प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांचा कडाडून विरोध आहे.
गिरगाव आणि काळबादेवी येथील मेट्रोच्या मार्गावर 115 कुटुंबं आणि 257 व्यापारी गाळ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजून सुटलेला नाही. असं असतानाही मेट्रोच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाश्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.आणि या असंतोषामुळेच हे काळं फासलं गेलंय, असं म्हटलं जातंय. पण यामागे नक्की कोण आहे हे अजून कळलेलं नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा