नोटबंदीचा निर्णय आवश्यकच, अडसुळांनी केली सेनेची गोची

नोटबंदीचा निर्णय आवश्यकच, अडसुळांनी केली सेनेची गोची

  • Share this:

anand_adsul423 नोव्हेंबर : नोटाबंदीवरुन विरोधकाशी हातमिळवणी करणा-या शिवसेनेत आता संभ्रम अवस्था निर्माण झालीये. एकीकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेण्याचा इशारा देत आहे तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे खासदार आनंद अडसूळ नोटाबंदीला पाठिंबा देत आहे.

नोटाबंदीच्या प्रश्नी शिवसेनेनं पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. लोकांच्या होणा-या गैरसोयीवरुन उद्धव ठाकरे यांनी मोदींविरोधात दंड थोपडले आहे. तृणमूल काँग्रेसने काढलेल्या मोर्च्यात शिवसेनेनं सहभागी होऊन भाजपला एकाप्रकारे इशाराच दिला. एवढंच नाहीतर सेनेच्या खासदारांनी मोदींची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला.

हे सगळं होऊन आता शिवसेनेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनेचे खासदार आनंद अडसूळ यांनी नोटाबंदीला उघडपणे पाठिंबा दिलाय. नोटाबंदीचा निर्णय आवश्यकच आहे. आम्ही ममतादीदींसोबत मोर्चात सहभागी जरी झालो असलो तरी त्यांच्या धोरणाला आमचा पाठिंबा नव्हता असं अडसूळ यांनी स्पष्ट करून सेनेची गोची केलीये. तसंच बाळासाहेबांबद्दल मोदींनी केलेल्या वक्तव्यावरुन आमच्या खासदारांनी बातमी फोडली असेल तर त्याला मोदी काय बोलले हे कळले नसेल असंही अडसूळ म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 23, 2016, 3:32 PM IST

ताज्या बातम्या