मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की कॉमेडियन?, ओवेसींची बोचरी टीका

  • Share this:

owasis3

21 नोव्हेंबर : नोटाबंदी निर्णयावरुन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नोटाबंदीमुळे संपूर्ण भारत हा कॅशलेस बनला असून मोदींने सगळ्यांना भिकारी करुन ठेवले आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी टीका केली आहे. तसेच मोदींची मीमिक्री करत, मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की कॉमेडी शो चे अॅक्टर, असा  टोलाही त्यांनी लगावला आहे.

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली. या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी एमआयएमचे महाराष्ट्रातील आमदार इमतियाज जलील, वारीस पठाण यांच्यासह एमआयएमचे नेते उपस्थित होते.

मोदींच्या निर्णयामुळे देश कॅशलेस बनला असून. यामुळे सामान्य जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे, असा आरोप  ओवेसींनी केला आहे.  काळा पैसा संपवा पण देशातील गरिबाला का संपवताय असा सवालही त्यांनी केला. यावेळी मोदी यांची मीमिक्री करत मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत की कॉमेडी शो चे अॅक्टर अशा शब्दात खिल्ली उडवली आहे.

तसंच अॅट्रॉसिटी कायदा आणि मराठा आरक्षणावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीवरही जोरदार हल्लाबोल चढवत, 15 वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत होती त्यांनी काय केले, असा सवाल उपस्थित करत राज्यात मुस्लीम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. अशी मागणीही त्यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2016 11:44 AM IST

ताज्या बातम्या