News18 Lokmat

कंगना-ह्रतिकच्या वादावर पोलिसांकडून पडदा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2016 09:31 PM IST

kangana_vs_hrithik roshan18 नोव्हेंबर : अभिनेत्री कंगना राणावत आणि ह्रतिक रोशन यांच्यातील मोठा वाद आता थांबण्याची शक्यता आहे. पोलिसांनी पुराव्याअभावी हा तपास थांबवला असल्याचं जाहीर केलंय.

मिळालेल्या माहितीनुसार ,पोलिसांच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटने एक एनआयएल रिपोर्ट सादर केला आहे. त्यात असे म्हटले आहे की, असा कोणताही पुरावा आम्हाला उपलब्ध होऊ शकला नाही की ज्याद्वारे आम्ही हे सिद्धा करु शकत नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. तसंच जे मेल्स ज्या आयडीवरुन आले होते ते एकत्र खोटे होते किंवा ते ह्रतिक रोशनचे अकाउंट होते याबद्दल कोणताही पुरावा मिळू शकला नाही.

कंगनाने ह्रतिकवर सायबर स्टॉकिंगचे आरोप लावल्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते. माध्यमांनीसुद्धा दोघांच्या बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यातही कोणतेच निष्कर्ष निघत नव्हते. अखेर पोलिसांनीही दोन्ही बाजुंनी तपास करुन हा रिपोर्ट सादर केला. त्यामुळे हा गॅल्मर राडा आता पेल्यातलं वादळं ठरलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2016 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...