17 नोव्हेंबर : सध्या नोटाबंदीमुळे सगळीकडे 'उधारी'चे दिवस आले आहे. आता पोलिसांनी सुद्धा उधारी सुरू केली असून पावती घ्या आणि दंड नंतर भरा अशी शक्कल पुणे पोलिसांनी लढवलीये.
हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीमुळे पुणे पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला मर्यादा आल्या होत्या. सुरुवातीचे दिवस वाहनचालकांना कारवाई न करता सोडून दिल्यानंतर आता पोलिसांनी दंडात्मक कारवाईसाठी अनोखी शक्कल लढवलीये.
पोलीस दंडाची पावती फाडून वाहनचालकांना देतात. पैसे नसले तर त्यांनी ते आठ दिवसांनी जमा करावेत असे सांगून पोलीस सोडून देतात. पोलिसांचा हा उधारी कारवाईचा फंडा अनोखा म्हणावा लागेल. जे वाहनचालक दंडाचे पैसे भरणार नाहीत अशा लोकांना शोधत फिरण्याची वेळ पोलिसांवर येऊ नये अशी चर्चा सुरू झालीये.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv