अंबाबाई आणि जोतिबाच्या दानपेट्या उघडल्या

अंबाबाई आणि जोतिबाच्या दानपेट्या उघडल्या

  • Share this:

ambabai416 नोव्हेंबर : कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरातील दानपेट्या आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने अचानकपणे उघडण्यात आल्या. शासकीय आदेश आल्याने या पेट्या उघडण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

एक हजार आणि पाचशेच्या नोटावर बंदी आणल्यानंतर त्या बदलण्याची मुदत 30 डिसेंबर पर्यंत आहे. त्यामुळे दानपेटीतील नोटा त्या कालावधीच्या आत बँकेत जमा कराव्या लागणार असल्याने देवस्थान समितीची गडबड उडाली आहे. तसंच दानपेटीमध्ये जे सुट्टे पैसे आणि 10, 20, 50, 100 च्या ज्या नोटा आहेत त्या वापरात येऊन सध्याचा चलनाचा तुटवडा कमी व्हावा म्हणून देवस्थान समितीने हा निर्णय घेतलाय.

देवस्थान समितीच्या अखत्यारीत येणा-या सर्वच मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद या आठवड्यात पूर्ण करून घेण्यात येणार आहे. खुल्या केलेल्या पेट्यातील रक्कमेत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांची संख्या अधिक आहे. या सर्व रक्कमांची मोजदाद करून याचा अहवाल विधी आणि न्याय खात्याला देण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 16, 2016, 10:46 PM IST

ताज्या बातम्या