सांगली, 16 नोव्हेंबर : देशभरात एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. पण, दुसरीकडे कुंपनानेच शेण खाल्याची घटना घडलीये. सांगलीत विविध एटीएम मशीनमधील तीन कोटी 33 लाख रुपयांवर कर्मचा-यांनीच डल्ला मारल्याची घटना उजेडात आलीये.
सांगली जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील तीन कोटी 33 लाख 39 हजार रुपयावर दोघानी डल्ला मारला आहे. एटीएममध्ये पैसे भरणा-या कंपनीच्या 2 कर्मचा-यांनीच हे पैसे भरल्याचे दाखवून पैसे हडप केले आहेत. जिल्ह्यातील विविध बँकांच्या 17 एटीएम मशीन मधील रक्कम हडप करण्यात आली आहे. या प्रकरणी संशयित लियाखत खान आणि अष्पाक बैरागदार यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. चार दिवसा पूर्वी, नवीन नोटा चेंज करण्यासाठी दोन दिवस एटीएम बंद होते, त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीना पोलिसांनी जेरबंद केले आहे.
जिल्ह्यातील विविध बँकेत रक्कम भरण्याचा ठेका सायंटिफिक सिक्युरिटी म्यानेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आहे. या कंपनीच कामगार लियाखत खान आणि अष्पाक बैरागदार यांनी एटीएममध्ये भरण्यास दिलेल्या रक्कमेपैकी तीन कोटी 33 लाख 39 हजार रक्कम बँकेत भरली नाही, आणि ही रक्कम त्यांनी परस्पर हडप केली.
बँक ऑफ इंडिया, कर्नाटका बँक, युनायटेड बँक या सारख्या बँकेच्या 17 एटीएम मशीन मधील रक्कम हडप करण्यात आली आहे. चार दिवसा पूर्वी, नवीन नोटा चेंज करन्यासाठी दोन दिवस एटीएम मशिन्स बंद होते, त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीना जेरबंद केले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv