आता व्हॉट्सअॅपवरूनही करता येणार व्ह‌िडिओ कॉल्स

आता व्हॉट्सअॅपवरूनही करता येणार व्ह‌िडिओ कॉल्स

  • Share this:

1-1

16 नोव्हेंबर :  मेसेज आण‌ि फोन कॉलिंगनंतर ‘व्हॉट्सअॅप’वरून आता आपल्याला व्ह‌िडिओ कॉलही करता येणार आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरुन याबाबत मार्क झुकरबर्गने घोषणा केली. जगभरातील एक अब्ज ग्राहकांना टप्प्याटप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.  आतापर्यंत स्काईप, फेसबुक, गुगल ड्युओ, व्हायबर यासारख्या काही सोशल अॅपवर व्हिडिओ कॉलिंगचा आॅपशन होता. पण आता अँड्रोइड ,आयओएस आणि विडोंज स्मार्टफोनसाठी ‘व्हॉट्सअॅप’ने एकत्रितपणे नवीन अपडेट उपलब्ध केलं आहे.

‘व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलिंग सुरु करण्याबाबत यूझर्सकडून गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला वारंवार विनंती केली जात होती. त्यामुळे हे फीचर जगासमोर आणताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.’ असं व्हॉट्सअॅपच्या ब्लॉगवर म्हटलं आहे. वायफायवरुन तुम्ही मोफत व्हिडिओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकाल, अन्यथा तुमच्या मोबाईल कंपनीच्या डेटानुसार इंटरनेटचा दर लागू होईल. तसंच, मेसेजप्रमाणेच व्ह‌िडिओ कॉलबाबतही संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल’, असं ‘व्हॉट्सअॅप’कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅप 19 बिलियन डॉलरला विकत घेतलं होतं. सध्या भारतात 15 कोटी अॅक्टिव्ह व्हॉट्सअॅप यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅपवर सध्या पर्सनल मेसेजिंग, ग्रुप चॅट, व्हॉईस कॉल यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत. भारतात दिवसाला सुमारे 10 कोटी व्हॉइस कॉल केले जातात. त्यामुळे फक्त महागडे फोन वापरणाऱ्यांकडेच नाही, तर प्रत्येकापर्यंत ही सेवा पोहचवण्याचा आपला मानस असल्याचं व्हॉट्सअॅपने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2016 09:29 AM IST

ताज्या बातम्या