23 लाख 'व्हाईट', 43 लाख 'ब्लॅक', वाह रे राहत साहब !

23 लाख 'व्हाईट', 43 लाख 'ब्लॅक', वाह रे राहत साहब !

  • Share this:

rahat fateh ali khan15 नोव्हेंबर : अलीकडेच पाकिस्तानी कलाकारांसाठी आपल्या काही भारतीय कलाकारांना प्रेमाचं भरतं आलं होतं. पण, आम्ही अशा पाकिस्तानी कलाकारांची पोलखोल करणार आहोत जे ऐकून तुम्ही कधीच विश्वास ठेवू शकणार नाही. आज आम्ही तुम्हाला लोकप्रिय गायक राहत फतेह अली खान यांचा काळा चेहरा तुम्हाला दाखवणार आहोत.

'दिल तो बच्चा है जी' या गाण्यातल्या बोलाप्रमाणं यांचं मनही तेवढंच साफ असायला हवं होतं. आज आम्ही तुम्हाला हे गाणं गाणा-या मनाचा काळेपणा आणि त्याच्या काळ्या कारभाराबात सांगणार आहोत. हे गाणं जेवढं मनाला भिडतं... तेवढीच त्याची दगलबाजी मोठी आहे. राहत फतेह अली खान... पाकिस्तानचा सर्वात मोठा गायक

दीड दशकांत बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमधील सुपरहीट गाणी राहत फतेह अली खान यानं गायलीयेत.चित्रपटातली गाणी असो की स्टेज शो... कव्वालीची मैफील असो की, लग्नाची संगीत संध्या... पैसा कमवायचा प्रत्येक मार्ग या राहत फतेह अली खानला माहिती आहे.

राहतचा एक कारनामा आमच्याजवळही आहे. भारतात राहत फतेह अली खानच्या कार्यक्रमाची सुपारी घेण्याचं काम मन्नू कोहिली आणि राकेश गुप्ता यांची कंपनी करते.

हे गुप्ता महाशय आम्हाला सांगत की, 17 डिसेंबरला राहतजवळ कार्यक्रमासाठी वेळ आहे. आणि लग्नाच्या संगीतसंध्येसाठी राहत भारतात यायला तयार आहे. अडचण व्हिसाची आहे. पण टेन्शन घेऊ नका भारतातल्या उच्चायुक्तालयात त्यांची पक्की सेटिंग आहे.

सुपारी जवळपास पक्की झाली होती. राहत यांच्याकडे वेळही होता. व्हिसाची सेटिंगही झाली होती. प्रश्न होता पैशांचा... गायक मोठा होता. मग पैसेही तसेच मागणार होता. आणि झालंही तसंच...

म्हणजे दोन तास गाण्याचे राहत 65 लाख रुपये घेणार होता.आता हे पैसे कसे घेणार असा प्रश्न होता. किती ब्लॅक आणि किती व्हाईट अशी वर्गवारी होणार होती. राकेश गुप्तांनी 65 लाखांपैकी 23 लाख व्हाईट म्हणजेच चेक किंवा डीडीने आणि बाकी पैसा ब्लॅकनी घेणार असल्याचं सांगितलं. म्हणजे 42 लाख रुपये सरकारशी लपवून द्यायचे होते.

म्हणजे गेल्या काही वर्षांत राहतचा ना आवाज बदलला ना त्याची आदत बदलली. पाच वर्षांपूर्वी याच राहतला दिल्ली एअरपोर्टवर रोकडसह पकडण्यात आलं होतं. तरीही त्याची सवय काही बदलली नाही. टॅक्स चोरी करण्यासाठी त्याच्याकडं एक शक्कलही होती. 42 लाख रुपये तो त्याच्या संस्थेसाठी दान म्हणून घेणार होता. म्हणजे तो पैसा सरळ राहतच्याच खिशात जाणार होता.

वाह राहत साहेब..,म्हणजे चोरी व्हावी आणि या कानाचं त्या कानाला कळूही नये. जर असे धोकेबाज पाहुणे असले तर देशाला शत्रुंची गरज कशाला असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 15, 2016, 11:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading