चोरट्यांनीही घेतला 500-1000 चा धस्का, फक्त 100 च्या नोटांवर डल्ला

चोरट्यांनीही घेतला 500-1000 चा धस्का, फक्त 100 च्या नोटांवर डल्ला

  • Share this:

thief15 नोव्हेंबर : काळा पैसा जमा करण्यासोबतच,चोरट्यांनीही 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाचा धसका घेतला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.नाशिकच्या घोटी येथे झालेल्या घरफोडीच्या चोरट्यांनी चक्क 500 आणि 1000 च्या नोटांना हातनं लावता 100 रुपयांच्या नोटा आणि घरगुती साहित्य घेऊन फरार झाले आहेत.

घोटी गावातील आंबेडकर नगर परिसरात राहणा-या अंजना रोकडे याच्या घरी घरफोडी झाली. अंजना रोकडे लग्नासाठी मुबंईला गेल्या होत्या याचाच चोरट्यांनी फायदा घेतला. घरातील लॉकरमध्ये असलेल्या 100 रुपयांचा बंडलवर चोरट्यानी हात साफ केला तर त्याच कपाटात असलेल्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांकडे दुर्लक्ष करत पोबारा केलंय. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 15, 2016, 8:53 PM IST

ताज्या बातम्या