पुन्हा रांगेत, राष्ट्र-महाराष्ट्र !

पुन्हा रांगेत, राष्ट्र-महाराष्ट्र !

  • Share this:

bank_q15 नोव्हेंबर : गेल्या पाच दिवसांपासून बँकाबाहेर उडाली झुंबड काल थांबली असता आज बँका सुरू होताच पुन्हा एकदाच तीच गर्दी पाहण्यास मिळतेय. देशभरा़तील बँकाबाहेर नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी लोकांनी तुफान गर्दी केलीये.

राजधानी दिल्लीत पहाटेपासून लोक बँक आणि एटीएमच्या बाहेर रांगा लावून उभे होते. तसंच मुंबईतही अगदी सकाळी 6 पासून बँकांबाहेर नोटा बदलून घेण्यासाठी रांगा लावलेल्या दिसत होत्या. अनेक ठिकाणी सलग दोन दिवस रांगेत उभे राहूनही लोकांना पैसे न मिळताच परत जावं लागलं होतं. त्यामुळे आजतरी पैसे मिळावेत यासाठी अगदी सकाळपासूनच लोक रांगेत उभे आहेत. तर पुण्यातही फारशी वेगळी परिस्थिती नाहीये. ज्येष्ठ नागरिकांपासून ते गरोदर महिलांपर्यंत सगळेचजण बँकेबाहेर आणि एटीमच्या रांगेत उभे असलेले दिसतायेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 15, 2016, 1:01 PM IST

ताज्या बातम्या