महापालिकांच्या तिजोरीत आतापर्यंत 554 कोटी जमा

  • Share this:

back_deposit14 नोव्हेंबर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात कर जमा झालाय. गेल्या तीन दिवसांत राज्यात 554 कोटी रुपयांचा कर जमा झालाय. सोमवारी गुरुनानक जयंतीची सुटी असूनही महापालिकांच्या कार्यालयात कराची रक्कम स्वीकारली जात होती.

शहरात ठिकठिकाणी रिक्षा फिरवून नागरिकांना घरपट्टी, पाणीपट्टीची रक्कम भरण्याचं आवाहन करण्यात येत होतं. त्यानुसार, नागरिकांनी कराची रक्कम जमा केली. महापालिकेच्या कार्यालयांमध्ये आता कराच्या रूपात आलेल्या नोटांचा ढीग जमलाय. सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 554 कोटी रुपयांचा कर जमा झालाय. कर जमा करण्यामध्ये पुणे महापालिका आघाडीवर आहे.

महापालिकांमध्ये जमला कर

पुणे 71 कोटी 42 लाख रु.

मुंबई - 11 कोटी 72 लाख रु.

नवी मुंबई - 22 कोटी 56 लाख रु.

ठाणे - 22 कोटी 50 लाख रु.

नगरपालिकांचा कर - 88 कोटी रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 10:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading