चांदोबा झाला 'मोठा', 'सुपरमून'पर्वाला सुरुवात

चांदोबा झाला 'मोठा', 'सुपरमून'पर्वाला सुरुवात

  • Share this:

super_moon414 नोव्हेंबर : आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे. यानिमित्ताने आपल्याला 'सुपर मून'चं दर्शन घडतंय. चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळ येतो तेव्हा चंद्रबिंब सर्वात मोठं दिसतं. म्हणूनच याला म्हणतात, सुपर मून ! हा सुपर मून नेहमीपेक्षा 30 टक्के जास्त तेजस्वी दिसतो. संपूर्ण रात्रभर आकाशात आपलं तेजस्वी दर्शन देऊन चंद्र उद्या सकाळी 7 वाजून 22 मिनिटानी मावळेल. कोजागिरी पौणिर्मेच्या चंद्रापेक्षाही तेजस्वी दिसणारा हा चंद्र पाहण्याची संधी सोडू नका !

चंद्राचं लोभसवाणं रूप पाहण्याची संधी

68 वर्षांपूर्वी 26 जानेवारी 1948 रोजी पौर्णिमेच्या दिवशी तो असाच पृथ्वीच्या जवळ आला होता. आता यानंतर 18 वर्षांनी 25 नोव्हेंबर 2034 रोजी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीपासून 3 लक्ष 56 हजार 445 कि. मी. इतका जवळ येणार आहे. (संग्रहित छायाचित्र)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: November 14, 2016, 7:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading