S M L

धक्कादायक, तीन मुलींना विष देऊन बापाची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2016 01:08 PM IST

धक्कादायक, तीन मुलींना विष देऊन बापाची आत्महत्या

मुंबई,12 नोव्हेंबर : एका जन्मदात्याने आपल्या 3 मुलींना विष देऊन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अंधेरीच्या साकीनाका परिसरातली ही घटना आहे.

मंगेश आणेराव असं या आत्महत्या करणा-या पित्याचं नाव आहे. प्रॉपर्टीच्या वादातून या बापानं हे कृत्य केल्याचं समजतंय. साकीनाका भागातील मोहिली व्हिलेज भागात सकाळी ही घटना घडली. 1 वर्षाच्या जुळ्या मुली आणि एक 4 वर्षांच्या मुलीला विष देऊन मारण्यात आलं. या प्रकरणी पोलीस पुढचा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2016 01:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close